शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने रडत राऊतची तंतरली, मनसेचं चोख उत्तर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ९ मार्चला विष्णूदास भावे नाट्यगृहात १४ वा वर्धापन दिन पार पडला. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमादरम्यान मनसेच्या अनिल शिदोरे यांनी शॅडो Mns Shadow Cabinet कॅबिनेटची घोषणा केली.
महाविकासआघाडीच्या मंत्र्यांच्या कारभारावर लक्ष देण्यासाठी या शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. मनसेच्या या शॅडो कॅबिनेटवर शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनातून टीका करण्यात आली आहे.
शिवसेनेने मनसेच्या शॅडो कॅबिनेटवर केलेल्या टीकेवर मनसेकडून चोख प्रत्युतर दिलं आहे. अमेय खोपकर यांनी याबद्दल ट्विट केलं आहे.
काय म्हणाले अमेय खोपकर ?
शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने रडत राऊतची तंतरली. अख्खा अग्रलेख ‘सावली’वर खर्च केल्याबद्दल ‘शॅडो’ संपादकांचे आभार, असा टोलादेखील अमेय खोपकर यांनी लगावला.
हा खेळ सावल्यांचा आत्ता कुठे सुरु झालाय. पिक्चर तो अभी बाकी है, भविष्यात ‘मोठी तिची सावली’हा अग्रलेख लिहायला लागू नये, असं काम महाखिचडीने करावं या सदिच्छा, असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलं आहे.
सामना अग्रलेखात काय म्हटलंय ?
महाराष्ट्रातील किंवा देशातील सध्याच्या विरोधी पक्षाची स्थिती पाहता ‘शॅडो’ कॅबिनेटचा प्रयोग म्हणजे ‘हा खेळ सावल्यांचा’ नाट्यप्रयोग ठरू नये.
लोकसभेत अधिकृत विरोधी पक्षनेताच नाही व राज्यात विरोधी पक्ष अद्याप बादशाही भूमिकेतून बाहेर पडायला तयार नाही. ‘शॅडो’ची घोषणा करताना त्यांच्या प्रमुख नेत्यांना छाया मंत्रिमंडळास तंबी द्यावी लागली की, ‘‘जपून करा, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार करू नका.’’ हे बरे झाले.