मारी बिस्किटाला २२ छिद्रे, अमेय खोपकर यांचं विनोदी ट्विट

देशात कोरोना विषाणूमुळे संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर लोकांनी घरात रहावं, असं आवाहन जनतेला करण्यात आलं आहे. या आवाहनाला जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे. तसेच सेल्फ इंटरटेन म्हणून लोकांनी घरबसल्या आपल्या विनोदबुद्धीचं दर्शन घडवून दिलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एक विनोदी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मारी बिस्किटला २२ छिद्र असल्याचं सांगितलं आहे.
अवघ्या काही मिनिटांमध्ये त्यांचं हे ट्विट व्हायरल झालं आहे.नेटीझन्सदेखील अशाच प्रकारे सोशल मीडियाद्वारे स्वत:च आणि नेटीझन्सचं मनोरंजन करत आहे.
दरम्यान अमेय खोपकर यांनी जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच हे कोरोना प्रकरण लवकरात लवकर संपावं आणि हे वर्ष लवकरात लवकर सुरू व्हावं हीच मनोकामना. काही दिवस घरी रहा, काळजी घ्या मग नवीन वर्ष जोरात साजरं करू, असं आवाहन त्यांनी जनतेला केलं.
कोरोना गो गो, कोरोना च्या आयचा घो, आठवलेंची कोरोना स्पेशल कविता
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही कोरोनावर गुढीपाडवा स्पेशल कविता केली आहे.