Wed. Mar 3rd, 2021

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता अयोध्येला जाणार आहे. १ मार्च ते ९ मार्चच्या दरम्यान त्यांचा अयोध्या दौरा असणार आहे. या दौऱ्यात राज ठाकरे रामलल्लांचं दर्शन घेणार आहेत. आज मुंबईमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये यासंदर्भात निर्णय घेतला. अशी ही माहिती पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदे द्वारे दिली. ९ मार्च नंतर राज ठाकरे राज्यभरात दौरा करणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली.

यापुर्वी उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाऊन रामलल्लांचं दर्शन घेतलं होतं. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेबद्दल प्रमुखविरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाने अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत.

आता मनसे आणि भाजपा एकत्र येण्यासंदर्भातील बातम्या अनेकदा चर्चेत असतात. याच सर्व पार्श्वभूमीवर हिंदुत्वावादी मतदारांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने मनसेचे प्रयत्न सुरु असल्याचं समजत आहे. राम मंदिराच्या बांधकामासाठी निधी संकलन सुरु झालं असल्याने अयोध्या राम मंदिराचा मुद्दाही चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर राम मंदिराचा प्रश्न सुटला होता. आता लवकरच राज ठाकरे अयोध्याच्या दौऱ्यावर जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *