वाडिया हॉस्पीटल बंद पडू देणार नाही – शर्मिला ठाकरे

वाडिया रुग्णालय वाचवण्यासाठी आंदोलनात आता मनसेनेही उडी घेतलेली आहे. वाडिया हॉस्पीटल बंद पडू देणार नसल्याचं राज ठकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत.
या आंदोलनात शर्मिला ठाकरेंसोबत मनसे नेते बाळा नांदगावकर सहभागी झाले.
आमचे हात जोडलेले आहेत, ते जोडलेलेच राहुद्यात, या शब्दात शर्मिला ठाकरेंनी इशारा दिला आहे.
शासनाने मुंबईतील महत्वाची आणि गरिबांना परवडणारी हॉस्पीटलं वाचवायला हवीत, असं शर्मिला ठाकरेंनी म्हटलं आहे.
काही दिवसांपासून वाडिया हॉस्पीटलमध्ये नव्याने कोणालाही दाखल करुन घेतले जात नाही आहे. तसेच रुग्णालयाला होणार औषधपुरवठा अपुरा होत आहे.
वाडिया हॉस्पीटलच्या कर्मचाऱ्यांचा मागील दोन-तीन महिन्यांपासून पगार मिळाला नाही. त्यामुळे हॉस्पीटल कर्मचाऱ्यांना पगारापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.