Mon. Dec 6th, 2021

एमआयएमच्या नेत्यांनी तोंड सांभाळून बोलावं, मनसेचा इशारा

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी इम्तियाज जलील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

इम्तियाज जलील तुम्ही लॉटरी लागून खासदार झाला आहात, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या नादाला लागयचं नाही. आत्ताच सांगून ठेवतो, हवं तर अबू आझमीला जावून विचारा, अशी तंबी नांदगावकर यांनी जलील यांना दिली आहे.

इंटरटेनर कोणाला बोलताय तुम्ही ? तुमचे औवेसी हैदराबादला जावून नाचले, आम्ही त्यांना नाचे म्हणू का ? असा सवाल देखील  बाळा नांदगावकर यांनी इम्तियाज यांना केला.

वारीस पठाण यांनी गणेशोत्सवात गणपती बाप्पा म्हणाले, म्हणून तुम्ही त्यांना माफी मागायला लावली. ही तुमच्या पक्षाची भूमिका आहे का ? असा सवालही नांदगावकर यांनी केला.

कोणाला बोलता, आमच्या अंगावर येऊ नका म्हणून, अंगावर आलात तर शिंगावर घेऊ. तुम्ही प्रयत्न तर करुन बघा, असे थेट  आव्हानच बाळा नांदगावकर यांनी इम्तियाज जलील यांना दिलं.

आमच्या नादाला लागायचा प्रयत्न करु नका, अन्यथा महागात पडेल. हैदराबादवरुन आलायेत, हैदराबादमध्येच रहा. इथं राहण्याचं नाटक करु नका, असेही नांदगावकर यांनी इम्तियाज जलील यांना म्हटलं आहे.  

आताच सांगतो, राज ठाकरेंबद्दल पुन्हा बोललात, तर तुम्हाला ते अडचणीचं ठरेल,खबरदार. अशा शब्दात बाळा नांदगावकर यांनी इम्तियाज जलील यांना ठणकावून सांगितलं.

एमएनएस अधिकृत या खात्यावरुन हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे.

नक्की प्रकरण काय ?

एमआयएमचे खासदार आणि प्रदेक्षाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंना लोकं  इंटरटेनर म्हणून पाहतात, अशी टीका केली होती. राज ठाकरे यांना जनता इंटरटेनर म्हणून पाहतात, त्यांच्या सभेला येतात पण मतं देत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

राज ठाकरे राजकारणात इतक्या वर्षापासून आहेत. त्यांना आताच मशिदीवरील भोंग्यांचा  त्रास व्हायला लागला का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी माध्यमांसोबत बोलताना आपली प्रतिक्रिया दिली.

मनसेचं गुरुवारी 23 जानेवारीला गोरेगावात अधिवेशन पार पडलं. यावेळी राज ठाकरेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की,  मशिदींवर भोंगे कशाला पाहिजेत ? आमच्या आरत्या जर त्याचा त्रास होत नसेल तर नमाजाचा लोकांना त्रास का? ,असे म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *