दगडाला दगडाने उत्तर, तलवारीला तलवारीने उत्तर मिळेल- राज ठाकरे

राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून अनेक मुद्द्यांना हात घातला. या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाषण केलं. तसेच अनेक प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केले आहेत.
भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी मोर्च्याला उपस्थित राहिल्याबदद्ल त्यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला मुस्लिमांचा उल्लेख केला.
मुस्लिमांनी काढलेल्या मोर्च्यांचा अर्थच लागला नाही. मुस्लिमांना ताकद दाखवण्याचं कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशमधील अल्पसंख्यांकांना नागरिकत्व देण्यास गैर काय आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
- आज आम्ही मोर्च्याला मोर्चाने उत्तर दिलं आहे. अजून उन्माद घातलात तर दगडाला दगडाने उत्तर आणि तलवारीला तलवारीने उत्तर मिळेल. एकोप्याने राहा, उगीच ताकद दाखवू नका.
- मी २०१२ च्या मोर्च्यात एका बांग्लादेशी दंगेखोराचा पासपोर्ट दाखवला होता. ज्यांनी ह्याच आझाद मैदानावर पोलीस भगिनींच्या अब्रूवर हात टाकला होता. यांची मजल बघा. ह्यांना हुसकावलंच पाहिजे.
- अनेक मराठी मुसलमान तिथे दंगली होत नाही. जिथे बाहेरून येतात तिथे गैरप्रकार होतात. फक्त बांगलादेशी मुसलमान नाही तर नायजेरियन घुसखोरांनी वसई-विरार-मिरा-भाईंदर इथे उन्माद घातला आहे.
- माझा देश म्हणजे धर्मशाळा आहे का? कुठूनही येतात आणि आपल्या देशात घुसखोरी करतात. बेरोजगारी आणि अन्य महत्त्वाचे मुद्दे आहेत तसंच घुसखोरीवरचं संकट हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
- देशात फक्त दोन भूमिकांमधून पाहिलं जातं. सरकारवर टीका केल्यास भाजपविरोधी ठरवंल जातं. तर अभिनंदन केलं तर समर्थक ठरवलं जातं. ठोस भूमिका म्हणून काही आहे की नाही. तीच आम्ही घेतो.