Tue. Jul 14th, 2020

पलावा उड्डाणपुलाच्या दिरंगाईबद्दल मनसे आमदार भेटणार केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना

कल्याण-शीळ महामार्गावरील पलावा (Palava) येथे नवीन उड्डाणपुलासाठी रेल्वेची मंजुरी मिळत नसल्याने या पुलाच्या कामात दिरंगाई होत आहे. त्यामुळे तोडगा काढण्यासाठी मनसेचे आमदार प्रमोद पाटील लवकरच रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

कल्याण शिळफाटा या मुख्य रस्त्यावरील होणाऱ्या सततच्या वाहतूक कोंडी मधून सुटकेसाठी पलावा येथे नव्या उड्डाणपूलाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

या रस्त्यावरील वाढलेल्या बांधकामांमुळे वाहतूक कोंडी (Traffic) होत आहे.

याबाबत KDMC कारवाई करत नसल्याची माहिती MSRDC च्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

याबाबत तातडीने कारवाई करून MSRDC ला सहकार्य करावं असे आदेश आमदार राजू पाटील यांनी KDMC च्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या प्रकल्पात रस्त्याचं रुंदीकरण होत आहे. पण भूमिपुत्रांना त्यांच्या जागेचा मोबादला मिळाला नसल्याने त्यांना तातडीने मोबादला मिळावा यासाठी KDMC आणि ठाणे महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन तोडगा काढणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.

रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत टोल बंद ठेवा

शिळफाटा ते काटई रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे (potholes) बुजवण्याची मागणी आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी केली आहे.

विशेष म्हणजे या रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत टोल बंद ठेवावा, ज्या कालावधीसाठी टोल नाका (Toll Plaza) बंद असणार आहे,त्याची मुदतवाढ देण्यात यावी असं आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे.

वाहतूक कोंडी मधून वाहनचालकांची सुटका व्हावी आणि प्रवास जलदगतीने व्हावा यासाठी आमदार राजू पाटील यांनी कामाला गती देण्याची मागणी केली आहे.

मात्र या कामात महत्त्वाचा अडथळा निर्माण झाला आहे तो रेल्वेच्या (DFCC) चा. त्यांच्याकडून परवानगी मिळाली नसल्याने उड्डाणपूलाच्या कामाला दोन ते तीन वर्षे लागण्याची शक्यता आहे.

या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र उड्डाणपूलाचं काम दिरंगाईने होत असल्याने अपघातांची संख्या वाढत आहे.

याच रस्त्यावर राज्यस्तरीय खेळाडू जान्हवी मोरे हिला जीव गमवावा लागला होता.

त्यामुळे अशा किती खेळाडू आणि वाहनचालकांचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पलावा येथील जुन्या उड्डाणपूलाचं काम रेल्वे करणार होती. मात्र रेल्वेची परवानगी मिळण्यास उशीर होत असल्याने आमदार राजू पाटील हे लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन कामातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *