वाघ आहे का बेडूक ? मनसेची शिवसेनेवर टीका

मनसेने पुन्हा एकदा सत्ताधारी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळेस मनसेने शिवसेनेवर सीएए आणि एनआरसीवरुन टीका केली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली आहे.
काय म्हणाले संदीप देशपांडे ?
लोकसभेत सीएए आणि एनआरसी ला पाठींबा दिला. तर राज्यसभेत विरोध. मोदींची पुन्हा भेटल्यानंतर पाठिंबा. वाघ आहे का बेडूक, अशा शब्दात शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिल्लीत अनेक नेत्यांची भेट घेतली.
यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लालकृष्ण अडवाणी आणि काँग्रेसच्या सोनिया गांधी यांची भेट घेतली.
दरम्यान अमित शाह आणि नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.
CAA बद्दल घाबरायची गरज नाही. हा कायदा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. या मुद्दयावरुनच संदिप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय.
दरम्यान राज्यासह देशभरात सीएए आणि एनआरसी विरुद्ध मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येत आहेत.