Thu. Mar 4th, 2021

मनसे नेत्यांकडून जितेंद्र आव्हाड यांचं समर्थन

महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट करणाऱ्या एका इंजिनिअरला आव्हाड यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केल्याचं समोर आलंय. यावेळी स्वतः आव्हाड यांच्या समोरच ही मारहाण झाल्याचं काहीजणांचं म्हटलं आहे, तर आव्हाड यांनी  मात्र आपल्या परोक्ष ही घटना घडल्याचं म्हटलं आहे. तरी विरोधकांनी आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसंच Twitter वरूनही आव्हाड यांच्याविरोधात टीका होत आहे. मात्र यावेळी मनसेतर्फे जितेंद्र आव्हाड यांचं समर्थन केलं आहे. तसंच अशा विकृतांना ठेचलंच पाहिजे असं मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे.  

 काय म्हणाल्या रुपाली पाटील?

अरे, काहीही पोस्ट, कमेंट… काही करणार का? असा सवाल रुपाली पाटील यांनी केला आहे. सोशल मीडिया म्हणजे आपल्या विकृतीचं साधन नाही, असं त्यांनी म्हटलंय. सोशल मीडियामधून काही सकारात्मक का घेत नाहीत? सेलिब्रिटी असो किंवा कोणत्याही पदाधिकारी, कार्यकर्ता कोणावरही विकृत कमेंट्स करू नयेत. जर विकृत कमेंट्स केल्या, तर विकृतपणे मार खावा, असं रुपाली पाटील यांनी म्हटलंय.

 जर जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल विकृत पोस्ट करण्यात आली. जर त्याबद्दल पोस्टकर्त्याला चोप दिला असेल, तर ते चांगलंच आहे. अशा विकृतांना ठेचायलाच हवं. सोशल मीडियावरील अशी विकृती संपवायलाच हवी, अशा शब्दांत आव्हाड यांचं मन, नेत्यांनी समर्थन केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *