राजसाहेबांची वाणी तलवारीसारखी चालत असते – बाळा नांदगावकर

राजसाहेबांची वाणी तलवारीसारखी चालत असते, असं बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. मनसेच्या 14 व्या वर्धापन दिनानिमित्ताने बाळा नांदगावकर यांनी हे विधान केलं आहे.
नवी मुंबईतील विष्णुदास भावे सभागृहात हा कार्यक्रम सुरु आहे. यावेळेस बाळा नांगदगावकर उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.
काय म्हणाले बाळा नांदगावकर ?
महाराष्ट्र सैनिकांनी गेल्या १४ वर्षात पक्षाला वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. कार्यकर्त्यांच्या या योगदानासाठी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाचे मनापासून अभिनंदन मानले.
मनसेचं 23 जानेवारीला महाअधिवेशन पार पडलं. या अधिवेशनाच्या नियोजन आणि मोर्च्यासाठी मेहनत घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीचं आभार मानले.
एका महिन्यावर नवी मु्ंबईची महापालिका येऊन ठेपली आहे. या महापालिका निवडणुकीसाठी उत्तम कामगिरी करुन आपला भगवा झेंडा राज्यभर नेऊया, असं बाळा नांदगावकर म्हणाले.
राजसाहेबांची वाणी तलवारीसारखी चालते. त्या वाणीच्या आदेशानुसार महाराष्ट्र सैनिक देखील धारधार कामगिरी करूया, असंही बाळा नांदगावकर म्हणाले.
दरम्यान राज ठाकरे काय म्हणणार याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.