Wed. Jan 19th, 2022

वाराणसीत मोंदीविरोधात प्रियांका गांधी लढणार?

लोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदार संघात मोदींविरोधात काँग्रेसकडून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींच्या नावाची चर्चा होत आहे. प्रियांका गांधीचं वाराणसीतून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहे. सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदार संघातुन प्रियांका निवडणूक लढणार आहे असं सांगण्यात येत होत. मात्र प्रियांका कार्यकर्त्यांनी गांधी यांना विचारले असता ‘मी वाराणसीतून निवडणूक का लढवू नये?’असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

यातूनचं प्रियांका गांधी वाराणसीतून निवडणूक लढण्यास उत्सुक आहेत असं म्हटलं जात आहे. प्रियांका गांधीं वाराणसीतून निवडणूक लढवणार असल्यास मोदींना वाराणसीतून बाहेर प्रचारासाठी जाता येणार नाही. हे त्यांच्यासाठी तगडे आव्हान ठरेलं अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. याचा विचार करूनचं पक्षाच्या बैठकीत प्रियांका गांधींनी वाराणसीतून लढाव असं सांगण्यात येत आहे. मात्र मला निवडणुकीच्या राजकारणात न अडकता पक्ष संघटनेवरच लक्ष केंद्रीत करायचं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

प्रियांका गांधीना वाराणसीची उत्सुकता

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी प्रथमचं प्रियंका गांधी मैदानात उतरल्या आहेत.

त्यांनी प्रयागराज ते वाराणसी अशी यात्रा केली यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

प्रियांकांना पाहून अनेकांना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आठवण येते.

याचबरोबर जनसामान्यांमध्ये प्रियांका गांधी यांची प्रतिमा चांगली आहे.

याच कारणास्तव प्रियांका गांधींनी यंदा निवडणूक लढवावी असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मत आहे.

या पार्श्वभूमीवरच पक्षाच्या बैठकीत प्रियांका गांधींना निवडणुक लढवावण्याविषयीचा प्रश्न कार्यकर्त्यांनी विचारला.

निवडणूक लढवायचीच असेल तर मग वाराणसीतून का नाही? असा सवाल प्रियंका गांधींनी कार्यकर्त्यांना केला.

मात्र मला निवडणुकीच्या राजकारणात न अडकता पक्ष संघटनेवरच लक्ष केंद्रीत करायचं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *