Wed. Oct 21st, 2020

मला चर्चेला न बोलावणं हा औरंगाबाद, हैदराबादचा अपमान- ओवैसी

कोरोनाच्या संकटावर अद्याप उपाय सापडलेला नाही. सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव पर्याय असल्यामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. मात्र या चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये MIM चे अध्यक्ष असदुद्दिन ओवैसी यांना आमंत्रण नाही. यामुळे ओवैसी संतापले आहेत. आपल्याला आमंत्रण नाकारणं हा औरंगाबाद आणि हैदराबादच्या जनतेचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

कोरोनाशी लढण्याच्या पार्श्वभूमीवर जी चर्चा पंतप्रधानांनी आयोजित केली आहे, त्यासाठी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनला निमंत्रित केलेलं नाही. त्यामुळे औवैसी यांनी सरकारवर टीका केली आहे. MIM ला औरंगाबाद आणि हैदराबाद या शहरांनी पसंती दिली आहे. त्यामुळे आमचं निश्चिच एक महत्त्वाचं स्थान आहे. आमच्याकडे दुर्लक्ष करण्याचं नेमकं कारण काय? असा सवाल Tweet द्वारे ओवैसींनी विचारला आहे.

 हैदराबाद आणि औरंगाबादमधून MIM चे उमेदवार जिंकून आले आहेत. आपण त्या लोकांच्या समस्या राष्ट्रीय पातळीवर मांडू असा तेथील लोकांचा विश्वास आहे. हैदराबादमध्ये कोरोनाचे ९३ रुग्ण आहेत. अशावेळी आम्हाला बोलावलंच नाही, तर आम्ही समस्या मांडणार कशा? असा सवाल ओवैसींनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *