गोरक्षेसाठी कोणत्याही प्रकारची हिंसा खपवून घेतली जाणार नाही; पंतप्रधान मोदींचा इशारा
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
गोरक्षेसाठी कोणत्याही प्रकारची हिंसा खपवून घेतली जाणार नाही अशा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे.
गोरक्षेच्या नावावर देशात होत असलेल्या हिंसक घटनांबाबतही पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा तीव्र संताप व्यक्त केला आहे.
हिंसक गोरक्षकांवर कठोर कारवाई होणार असल्याचे मोदींनी सांगितले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान बोलत होते.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत पंतप्रधानांनी गोरक्षकांसह विविध मुद्द्यांवर आपले मत स्पष्ट केले.