Sun. May 9th, 2021

भारतात गुंतवणूक करुन भारताच्या विकासात योगदान द्या; पंतप्रधान मोदींचे आवाहन

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

भारत एक व्यवसायासाठी अनुकूल देश म्हणून समोर येत आहे. त्यामुळे भारतात गुंतवणूक करुन भारताच्या विकासात योगदान द्या, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी

यांनी अमेरिकेतील टॉप 21 कंपन्यांच्या सीईओंना केले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरातल्या 21 दिग्गज कंपन्यांच्या सीईओंची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी आज मोदींची भेट होणार आहे. मात्र, त्याआधी टॉप 21 कंपन्यांच्या सीईओंसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची बैठक पार

वॉश्गिंटनमध्ये पार पडली.

 

या बैठकीत गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, अॅपलचे सीईओ टीम कूक, अॅमेझॉनचे जेब बिसोज यांचा समावेश होता. भारताने गेल्या तीन वर्षात सर्वात जास्त परकीय

गुंतवणूक आणली आहे, याकडेही मोदींनी लक्ष वेधले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *