राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबाची काळजी करू नये; शरद पवारांचे मोदींना प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबावर घणाघाती टीका केली होती. कोल्हापूर येथील जाहीर सभेत शरद पवारांनी मोदींच्या टीकेवर चोख प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबाची काळजी करू नये. तसेच पक्षाची काळजी करण्यासाठी राज्यातील आणि देशातील कार्यकर्ते सज्ज आहेत असेही त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले शरद पवार ?
पंतप्रधान मोदींनी वर्धा येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली.
तसेच अनेक मुद्दे उपस्थित करत पवार कुटुंबावरही टीका केली.
मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी आयोजीत केलेल्या जाहीर सभेत बोलत असताना शरद पवार यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले.
मोदींनी राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबाची काळजी करू नये असे शरद पवार म्हणाले.
तसेच पक्षाची काळजी करण्यासाठी राज्यातील आणि देशातील कार्यकर्ते समर्थ आहेत असेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी पक्ष हा एकट्या दुकट्याचा पक्ष नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
दोन वर्षात 15 हजारहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.