आता क्रेझ ‘मोदी सीताफळ कुल्फी’ची !

नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदी यांची लाट देशात अजूनही मोठ्या प्रमाणावर आहे. आत्तापर्यंत मोदी कुर्ता, मोदी साडी, मोदी पतंग तुम्ही पाहिले असतील. पण सूरतमधील एका आईस्क्रीम पार्लरमध्ये चक्क ‘मोदी कुल्फी’ विकायला ठेवली आहे. विवेक अजमेरा यांनी ही खास कुल्फी सादर केली असून या कुल्फीचं नाव ‘नरेंद्र मोदी सीताफळ कुल्फी’ असं केलं आहे.
काय आहे या कुल्फीचं वैशिष्ट्य?
या कुल्फीचा आकार चक्क मोदी यांच्या चेहऱ्याप्रमाणे आहे.
हा चेहरा तयार करण्यासाठी कोणताही साचा नाही.
खास कुशल कारागीर ही कुल्फी हाताने तयार करतात.
यासारख्या 200 कुल्फी बनवण्यासाठी 24 तास लागतात.
ही कुल्फी पूर्णपणे नैसर्गिक पदार्थांपासून बनवली गेली आहे.
या कुल्फी मध्ये कोणत्याही रसायनाचा वापर केला गेलेला नाही.
पण ही कुल्फी केवळ मोदींच्या शपथविधीच्या दिवसापर्यंतच विकण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय.
मोदींच्या शपथविधीनंतर या कुल्फीची विक्री थांबवण्यात येणार आहे. त्यातून सध्या BJP जिंकल्याप्रीतर्थ्य ही कुल्फी 50 % discount मध्ये विकण्यात येतेय. त्यामुळे ही कुल्फी खायला लोकांची गर्दी होतेय.