Fri. Nov 27th, 2020

अमेरिका-भारत मिळून करणार दहशतवादाचा खात्मा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

दहशतवादाविरोधात अमेरिका आणि भारत साथ साथ दिसणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीत दहशतवादाचा बिमोड

करण्यावर एकमत झाले.

 

अमेरिकेच्या दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान मोदींचं डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये स्वागत केले. व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांची भेट घेणारे मोदी हे पहिले पंतप्रधान

आहे.

 

या दोघांमध्ये यावेळी 40 मिनिटांची चर्चाही झाली. दहशतवाद, अफगाणिस्तानमधली अस्थिरता अशा अनेक मुद्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

 

दोन्ही देश एकत्र येऊन दहशतवाद संपवू असं या बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले.

 

भारत हा अमेरिकेचा खरा मित्र असून, मोदी हे महान पंतप्रधान असल्याचा उल्लेख डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. मोदींनीही ट्रम्प यांना भारत भेटीचं आवताण दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *