Fri. Nov 27th, 2020

शेतकरी कर्जमाफी हा उपाय नाही – मोहन भागवत

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

शेतकरी कर्जमाफी करणे हे शेती समस्यांवरील उत्तर नसून शेती फायद्याची व्हावी यासाठी प्रयत्न करावे लागतील.

 

शेती फायद्यात चालावी यासाठी उद्योग आणि व्यापार जगतानं शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे तसेच शेतीमालाला योग्य दर आणि हमी भाव मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांची

समस्या सुटणार नाही.

 

असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरने आयोजित केलेल्या 44 व्या

वालचंद स्मारक व्याख्यानमालेत ‘समर्थ भारत’ या विषयावर भागवत बोलत होते.

 

या वेळी व्यासपीठावर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाकर्जमाफी’ जाहीर केल्यावर

भागवत यांनी हे मत व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *