Tue. Nov 24th, 2020

‘पोलिस स्वत:च्या बापाचं मैदान समजतात काय’? – विजय वडेट्टीवार

आज विधानसभेचा 5 वा दिवस आहे. यावेळी शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर चांगलेच घमासान झाले. यावरून विरोधक आमने – सामने आल्याने आल्यामुळे चांगलाच गदारोळ झाला. यामध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनात शिक्षकांना मिळालेल्या वागणुकीवरून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. 2005 च्या पूर्वी रुजू झालेल्या शिक्षकांना पेन्शन लागू करावी. या मागणीसाठी वडेट्टीवार यांनी विधानसभेत चांगलच धारेवर धरलं.

विधानसभेत वडेट्टीवार आक्रमक

विधानसभेत शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर चांगलेच घमासान झाले.

आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनात शिक्षकांना मिळालेल्या वागणुकीवरून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झाले आहेत.

मुंबईच्या आझाद मैदानावर जुन्या पेंशन धारक शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाचे नेतृत्व कृषिमंत्र्यांची बहीण संगीता शिंदे या करत आहेत.

शिक्षकांची रास्त मागणी आहे. 2005 च्या पूर्वी रुजू झालेल्या शिक्षकांना पेन्शन लागू करावी. या सरकारने तिकडे अजिबात लक्ष घातले नाही.

आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यांना संध्याकाळी आंदोलनाला बसू देत नाही. तिथल्या डीसीपीने संध्याकाळी 6 नंतर आंदोलनाला बसू नका अशी तंबी दिली.

त्यामुळे या डीसीपीचे निलंबन व्हायला हवं. हा अधिकारी सरकारच्या आदेशावर चालतो का? त्यामुळे या अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी.

खेड्यामधील अंगणवाडी सेविकांचे केंद्र सरकारने मानधन निश्चित केले असताना देखील त्यांना वाढीव मानधन मिळत नाही.

अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *