Sat. Jan 16th, 2021

यंदा मान्सून 6 जूनपर्यंत दाखल होणार; भारतीय हवामान विभागाचा अंदाज

देशात उन्हाचा तडाखा वाढत असल्यामुळे नागरिक आणि शेतकरी पावसाळ्याची वाट बघत आहेत. मात्र यंदा पाऊस 6 जूनपर्यंत केरळ किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र केरळमध्ये मान्सून 4 जूनपर्यंत दाखल होणार असल्याचे खासगी हवामान संस्था स्कायमेटने व्यक्त केली आहे.

यंदा पावसाळा लांबणीवर –

यंदा पाऊस 6जूनपर्यंत केरळ किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला.

महाराष्ट्रात पाऊस सहा ते सात दिवसात धडकणार असल्याचेही म्हटलं आहे.

त्यामुळे मान्सून लांबण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच केरळ किनारपट्टीवर 4 जूनपर्यंत मान्सून धडकणार असल्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.

राज्यातसह देशातही दुष्काळ पडला असून शेतकऱ्यांसह नागरिकही पावसाची वाट बघत आहे.

मात्र हा अंदाज कितपत खरा ठरेल ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *