Thu. Nov 26th, 2020

रामनवमीच्या 3 दिवसांत साईचरणी 4 कोटी 16 लाख किंमतीचं दान

रामनवमी उत्सव काळातील 3 दिवसात शिर्डीच्या साईबाबांना साईभक्तांनी सुमारे 4 कोटी 16 लाख किमतीचं दान चढवलं आहे. यात रोख रक्कम,सोनं, चांदी आणि वस्तू स्वरूपातील दानाचा समावेश आहे.

​​या उत्सव काळात देशभरातून आलेल्या सुमारे 2 लाखांहून अधिक भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं.

भाविकांनी दान स्वरूपात अर्पण केलेल्या रकमेची मोजणी करण्यात आली.

यामध्ये रोख स्वरुपात 1 कोटी 92 लाख दान मिळालं.

मंदीर परीसरातील देणगी काऊंटरवर 98 लाख 20 हजार रुपये

ऑनलाईन डोनेशनच्या डेबिट, क्रेडिट,चेक, डीडी च्या माध्यमातून 1 कोटी 11 लाख 978 हजार रुपये

याच बरोबरीने 7 लाख रुपयांचे सोने  तर 1 लाख 11 हजार रुपयांची चांदी  साईभक्तांनी अर्पण केली आहे.

वेगवेगळ्या 17 विदेशतील भक्तांनी साई समधीचं दर्शन घेतलं असून सुमारे 5 लाखांच्या विदेशी करन्सी दान स्वरूपात साईंना भेट देण्यात आल्या आहेत.

‘सबका मालिक एक है’ या मूलमंत्राच्या आधारे साईबाबांनी सर्वजाती धर्मांना एका छताखाली आणलं.

त्या साईंच्या दरबारी गरीबातील गरीब आणि श्रीमंतातील श्रीमंत आपल्या यथाशक्ती आपली श्रद्धा आर्पित करत असतो.

भाविकांच्या मते बाबांना एका हाताने दिले तर बाबा हजारो हाताने भरभरुन देतात.

याच धारणेमुळे आज काही हजारात स्थापन झालेल्या संस्थानाकडे कोटींचं दान जमा झालंय.

ही सर्व रक्कम साई संस्थान सेवेतील कर्मचारी, प्रशासन, मंदिर खर्च, भाविकांच्या सुविधा, हॉस्पिटल, अन्नदान, निवासस्थानं त्याच बरोबर शिर्डीच्या विकासावर खर्च करतं.

सन 1920 साली सुरू झालेल्या साई संस्थानच्या खात्यामध्ये 1600 रुपये होते.

आजमीतीला साई संस्थानची विविध बँकांमधील फिक्स डिपॉझिट्स 2200 कोटींची आहेत.

तसंच साई संस्थानकडे आज 430 किलो सोने आणि 5000 किलो चांदी जमा आहेत.

साईंची महिमा आज जगाभरात पोहचल्याने कधी काळी फकिराची नगरी म्हणून ओळखली जाणारी शिर्डी आता कुबेराची नगरी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *