इन्स्टाग्रामवरील ‘मोस्ट लाइक्ड’ अंड्याचे रहस्य काय ?

काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक अंड्याचा फोटो पोस्ट करण्यात आला होता. या फोटोला प्रचंड लाइक्स मिळाले होते. हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कायली जेनरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट केलेल्या फोटोचाही रेकॉर्ड ब्रेक करणारा हा अंड्याचा फोटो ठरला आहे. मात्र हा फोटो फक्त अंड्याचा असल्यामुळे त्याला एवढे लाइक कसे मिळाले ? असा प्रश्न उपस्थित झाला होता. हा फोटो ‘वर्ल्ड रेकॉर्ड एग’ या इन्स्टाग्राम आकाउंटवरुन पोस्ट केला आहे. ‘चला एकत्र मिळून नवा वर्ल्ड रेकॉर्ड बनवू आणि या पोस्टला इन्स्टाग्रामवरील सर्वात जास्त लाइक्स मिळवू. सध्या असलेल्या कायली जेनरच्या वर्ल्ड रेकॉर्ड पोस्टला तोडून टाकू या’, असे या फोटोला कॅप्शन देण्यात आले होते. यानंतर या आकाउंटवरुन अंड्याचे अनेक फोटो पोस्ट करण्यात आले आहे. याच अकाउंटवरुन एक अंड्याचाही व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये त्या अंड्याचे रहस्य सांगण्यात आले आहे.
अंड्याचे रहस्य ?
वर्ल्ड रेकॉर्ड एग या आकाउंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला.
या व्हिडीओमध्ये मानसिक समस्या भेडसावत असतील तर कुणाशी तरी बोला असे सांगण्यात आले आहे.
हा 30 सेकंदाचा व्हिडीओ आहे.
या व्हिडीओ पोस्टला 5.2 लाख लाइक्स मिळाले आहेत.
तसेच 1 कोटीहून जास्त लोकांनी ही पोस्ट पाहिली आहे.
मानसिक आरोग्यावर बोलण्यासाठी अंडंच का ?
लंडनचे 29 वर्षीय क्रिस गॉडफ्रेय यांनी हे अकाउंट तयार केले आहे.
अंड्यांला ना कोणते लिंग असते, ना धर्म असतो, ना जात. अंडे केवळ अंडे असते. ते सर्वमान्य आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.