Thu. Jul 16th, 2020

भारतात ‘या’ app वर तरुण करतात सर्वाधिक पैसे खर्च

हल्ली प्रत्येक गोष्टीसाठी apps असल्यामुळे तरुणांच्या मोबाईलमध्ये भरमसाठ apps डाऊनलोड केलेली पाहायला मिळतात. यातील Whatsapp, Instagram, Facebook, TikTok सारखी सर्वाधिक वापरली जाणारी काही apps फुकट वापरता येतात. याशिवाय Ola पासून ते Zomato पर्यंत अनेक apps तरुण मोठ्या प्रमाणावर वापरतात. घराच्या समस्यांवर उपाय म्हणून magicbricks, 99acres यांसारखी apps लोकप्रिय आहेत. पण paid apps (पैसे भरून सबस्क्रिप्शन घ्यावं लागणारी apps) मध्ये रोजगाराचा मोठा प्रश्न असल्यामुळे Naukri.com या apps वर पैसे लोक जास्त खर्च करत असावेत, असा अंदाज तुमचा अंदाज असेल, तर तो साफ चूक आहे. तरुणाई सर्वाधिक पैसे उधळतेय ते ‘Tinder’ या app वर.

काय आहे Tinder app?

टिंडर हे ऑनलाईन डेटिंग ऍप (Online Dating App) आहे.

Tinder वर मुलं मुली आपल्या आवडीनुसार अनोळखी व्यक्तीला पसंत करू शकतात आणि आपला प्रेमी निवडू शकतात.

आपल्या आसपासच्या भागात असणाऱ्या व्यक्तीचे फोटो आणि प्रोफाईल्स या app वर दाखवले जातात.

यातून हवी ती व्यक्ती निवडून त्यांच्याशी बोलता येतं.

भोटीगाठी आणि रोमांसही करता येतो.

त्यामुळेच अतिउत्साही किंवा नवनवे जोडीदार शोधण्याची मजा घेऊ इच्छिणारी तरुण मुलं मुली या app च्या subscription साठी पैसे सर्वाधिक खर्च करतात.

Tinder प्रमाणे Bumble, Woo इत्यादी डेटिंग apps सुद्धा तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. मात्र Tinder ला सर्वाधिक पसंती मिळत असल्यामुळे त्यावरच सर्वाधिक खर्च तरुणाई करतेय.

गंमत म्हणजे लग्न जुळवण्यासाठी असणारी जीवनसाथी, शादी.कॉम यांसारखी apps ही आहेत. मात्र त्यांच्या सबस्क्रीप्शनपेक्षा डेटिंग app चं सबस्क्रिप्शन जास्त आहे.

तसंच Naukri.com., LINKEDIN सारखे अत्यंत उपयोगी apps आहेत, परंतु त्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा Tinderसारख्या डेटिंग app वर भारतीय जास्त पैसे खर्च करत आहेत. शिवाय Netflix, Hotstar सारख्या apps वरही भारतीय लोक जास्त पैसे खर्च करतात. मात्र TInder चाच नंबर सर्वांत वर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *