शिवभोजन योजनेला पहिल्याच दिवशी भरघोस प्रतिसाद

प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर राज्यातील अनेक जिल्ह्यात शिवभोजन योजनेचं शुभारंभ केलं गेलं. प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या योजनेचं आप आपल्या जिल्ह्यात शुभारंभ केला गेला.
राज्यातील जनतेनेही या शिवभोजन योजनेला भरघोस प्रतिसाद दिला. पहिल्याच दिवशी राज्यभरात शिवभोजन योजनेअंतर्गत एकूण ११ हजार, २७४ थाळ्यांची विक्री झाली.
राज्यात एकूण १२५ ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आलं आहे.
ठाणे आणि नाशकात सर्वाधिक थाळ्यांची विक्री
शिवभोजन योजनेचा पहिल्याच दिवशी ठाणे आणि नाशिककरांनी सर्वाधिक लाभ घेतला.

नाशकात पहिल्या दिवशी एकूण १००० तर ठाण्यात १३५० थाळ्यांचा विकल्या गेल्या.
तसेच सोलापूर, अहमदनगर, जळगाव या भागात ७०० थाळ्यांची विक्री झाली.विक्री झालेल्या थाळ्यांची जिल्हानिहाय आकडेवारी ही राज्य सरकारच्या सार्वजनिक वितरण विभागाने आकडेवारी जाहीर केली आहे.