Thu. Jul 2nd, 2020

मुलीनं केला प्रेमविवाह; आई-भावाने उचलले टोकाचे पाऊल

जय महाराष्ट्र न्यूज, धुळे

आजच्या आधुनिक जगात आपण स्त्रियांच्या स्वाचंत्र्यबद्दल बरचं काही बोलतो. पण, वास्तवात अशा प्रकारचं काहीचं होत नसतं. आजही मुलींना दुय्यम स्थान दिले जाते. त्याचबरोबर त्यांच्या प्रेमसंबंधालाही विरोध केला जातो. अशाच प्रकारची घटना धुळे शहरात घडलीय. मुलीने प्रेम विवाह केल्याच्या मनस्तापातुन धुळे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे.

त्या मुलीच्या आई आणि भावाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केलीय. ही घटना शहरातील पद्भनाम नगरात घडलीय. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, प्राथमिक माहितीवरून मुलीने प्रेमविवाह केल्यामुळे आई आणि भावानं आत्महत्या केल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *