Mon. Apr 6th, 2020

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा जीवनप्रवास रूपेरी पडद्यावर

पुण्यश्लोक अहिल्या बाई होळकर यांच्या जीवनावर आधारित ‘पुण्यश्लोक अहिल्या देवी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी आणि मराठी भाषेत सिनेमा पहायला मिळणार आहे. गुरूवारी 6 फेब्रुवारी रोजी मंत्रालयात या सिनेमाचं पोस्टर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आलं.

अजित पवारांनी पोस्टर प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचा फोटो ट्विटरवरून शेअर केला आहे. आदर्श माता अहिल्यदेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित सिनेमा काढण्याचा निर्णय खरोखरचं कौतुकास्पद आणि आभिनास्पद आहे.असं त्यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.

यावेळी अजित पवारांनी सिनेमाचे दिग्दर्शक श्री. दिलीप भोसले आणि निर्माते श्री. बाळासाहेब पाटील याचं तमाम महाराष्ट्राच्या वतीनं अभिनंदनही केलं. तसेच कार्यक्रमाला पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री दत्तत्रय भरणे,राज्यमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे आणि सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते हि उपस्थित होते.

या आधी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अभिनेत्री उर्मिला कानेटकर- कोठारे हिने अहिल्या बाईंची भूमिका साकारली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *