#MPSC : पूर्वपरीक्षा नियोजित वेळेापत्रकानुसारच होणार – राज्य लोकसेवा आयोग

राज्यात एका ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परंतु दुसऱ्या ठिकाणी मात्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा ही नियोजित वेळापत्रकानुसार होणार असल्याची माहिती राज्य लोकलेवा आयोगानं दिली आहे. याबाबत राज्य लोकसेवा आयोगाने एक प्रसिद्धीपत्रक काढलं आहे.
राज्यात १६ ते ३१ मार्चदरम्यान कोणत्याही परीक्षा न घेण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. पण राज्य सरकारच्या आदेशानंतर देखील राज्यसेवेची पूर्व परीक्षा 5 एप्रिललाच होणार असल्याचं आयोगानं प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केलयं.
या निर्णयामुळे राज्यसेवेची पूर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.