Jaimaharashtra news

मुक्ता बर्वेनं आणली पुण्यातील नाट्यगृहाची दुरवस्था सर्वांसमोर

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

प्रशांत दामले आणि राघवण पाठोपाठ आता अभिनेत्री मुक्ता बर्वेनं पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यग़ृहातील दुरवस्थेचे चित्रण सर्वांसमोर आणले आहे.

 

अभिनेत्री मुक्तानं तिच्या फेसबुक अकाऊंटवरून नाट्यगृहातील शौचालयाचे फोटो शेअर केले. त्यामुळे नाट्यगृहांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला. याबाबत अनेकदा लिहून झाले. बोलून झाले. मात्र, परिस्थिती जैसे थेच पाहायला मिळाली.

 

मुक्तानं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये नाट्यगृहातील अस्वच्छ शौचालय दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिनं प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आपला राग व्यक्त केला.

Exit mobile version