Fri. Mar 5th, 2021

मुंबईत हवेच्या गुणवत्तेत घसरण

कारखानदारी आणि बांधकाम क्षेत्रे, वाढलेली वाहनांची वर्दळ यामुळे हवेची गुणवत्ता ढासळली…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदी दरम्यान कारखानदारी, बांधकाम तसेच कमी वाहनांच्या संख्येमुळे हवेचा निर्देशांक उत्तम नोंदविण्यात आला होता. परंतु गेल्या काही काळामधे हवेचा गुणवत्ता निर्देशांक पुन्हा घसरल्याचे दिसत आहे. अनलॉकमुळे सुरू झालेली कारखानदारी आणि बांधकाम क्षेत्रे, वाढलेली वाहनांची वर्दळ यामुळे हवेची गुणवत्ता ढासळली आहे. तसेच हिवाळ्यात वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे हवेतील प्रदूषित घटक हवेत विरळत नाहीत.एकंदरीत हवेची गुणवत्ता खालावत जाऊन प्रदूषणाचे प्रमाण वाढत जात आहे,असे सफरच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. SAFAR (सिस्टिम ऑफ एअर क्लालिटी अॅण्ड वेदर फोरकास्टिंग अॅण्ड रिसर्च) ने दिलेल्या माहितीनुसार चेंबूर,मालाड,बीकेसी,विलेपार्ले,नवी मुंबई,माझगाव इथला हवेचा गुणवत्ता स्तर वाईट स्तरावर पोहोचला तर भांडुप,कुलाबा,बोरिवली,अंधेरी,पवई या ठिकाणचा हवेचा स्तर मध्यम नोंदवला गेला. राज्यातील शहरांमधील हवेतील प्रदुषण सुधारण्यासाठी केंद्र सरकारने राज्यसरकारला 396 कोटी 50 रूपये इतका निधी जाहीर केला आहे असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *