Thu. Apr 22nd, 2021

Google Earth च्या जगातील सर्वांत सुंदर 1000 स्थळांच्या यादीत ‘या’ जागेचाही समावेश

जगातील सर्वांत सुंदर 1000 हजार स्थळांची यादी Google Earth ने आपल्या Twitter हँडलवर शेअर केली आहे. त्यामुळे आता एकूण बर्ड आय व्ह्यू इमेजेसची संख्या 2500 एवढी झाली आहे. यामध्ये सातही खंडांमधील प्रेक्षणीय स्थळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यामध्ये भारतातील 35 स्थळांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचादेखील या प्रेक्षणीय जागांमध्ये समावेश आहे.

महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, कर्नाटक या राज्यांतील स्थळांना या 1000 फोटोंच्या यादीत मानाचं स्थान मिळालं आहे. लक्षद्वीप येथील 7 किलोमीटर विस्तार असणाऱ्या अगत्ती बेटांचं विहंगम दृश्य यांपैकी एक आहे.   

Google Earth वापरून एखादं ठिकाण बर्ड आय व्ह्यूने पाहणं शक्य होतं. याचाच विचार करून आकाशातून दिसणाऱ्या प्रेक्षणीय ठिकाणांचाही यात समावेश आहे. हाय रिझोल्युशन सॅटेलाईट इमेजेस दिसतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *