आता मुंबई महानगर पालिका मुख्यालयाची पर्यटकांना सफर

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोर असलेल्या मुंबई महापालिका मुख्यालयाच्या भव्य इमारतीचे आता आतून सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार आहे. मुंबईकरांना नागरी सुविधा उपलब्ध करून देणारी पालिका मुख्यालय इमारत आतून पाहण्याची संधी आता सर्वांना मिळणार आहे.
गॉथिक शैलीतील एकशे पन्नास वर्षाच्या इमारतीचा ऐतिहासिक वारसा आता उलगडला जाणार आहे. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांनाही हेरिटेज सफर करता येणार आहे. या वास्तूचे पर्यटन घडावे यासाठी गेल्या वर्षी पालिका आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता. आता कालपासून, २८ जानेवारीपासून ही पुरातन वास्तू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पर्यटनासाठी खुली करण्यात येत आहे. यावेळी मदतीसाठी गाईडही असणार आहे.