Wed. Aug 10th, 2022

मुंबईत लसीकरणात ६४ टक्क्यांनी घट

मुंबई: मुंबई शहरात एकीकडे रेल्वे प्रवास करता यावा यासाठी रात्रीपासून रांगा लावून लस घेण्यासाठी नागरिक धडपडत असताना लसच उपलब्ध नसल्याने गेल्या पंधरा दिवसांत लसीकरणात ६४ टक्यांनी घट झाली आहे. तसेच राज्यातील लसीकरणही रोडावले आहे. १ ते १० ऑगस्ट दरम्यान ३० टक्क्यांची घट आहे.

पालिकेला गेल्या दहा दिवसांत केवळ १ लाख ४९ हजार मात्रा मिळाल्या असून त्यामुळे जुलैच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये लसीकरणात घट झाल्याचे दिसतेय. पालिकेला १० ऑगस्टपर्यंत १ लाख ४९ हजार मात्रा मिळाल्या. यात कोव्हिशिलडच्या १ लाख १ हजार आणि कोव्हॅक्सिनच्या ४८ हजार मात्रा मिळाल्या. लशींचा साठा नसल्यामुळे पालिकेला ४ ऑगस्टला लसीकरण बंद ठेवावे लागले, तर मंगळवारीही अपुरा साठा असल्यामुळे केवळ ५३ लसीकरण कक्ष कार्यरत होते. या दिवशी शहरात ५७८५ नागरिकांना लस देण्यात आली.

राज्यातील लशींचा साठा

१ ते १० जुलै ३९,४३,२७६

११ ते २० जुलै ३०,१५, ३३५

२१ ते ३१ जुलै ३९,८४,६२७

१ ते १० ऑगस्ट २७,९६२,२७८


मुंबईला आतापर्यंत प्राप्त लशीची मात्रा

महिना एकूण लस

मे ५,२३,४४० लाख

जून ७,३९,१९०लाख

जुलै ९,८३,३९० लाख

ऑगस्ट १,४९,००० लाख

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.