आरे जंगलात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवलं

मुंबई – गोरेगाव भागातील आरे जंगलात आग लागल्याची घटना घडली आहे. रॉयल पाम हॉटेलमधून फेकण्यात आलेल्या कचऱ्याने पेट घेतल्यानं ही आग लागली असं स्पष्ट झालं आहे. या घटनास्थळी अग्मिशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या.
आगेचा भडका इतका वाढला की आगेवर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न अग्निशमक दलने केले. आता ही आग विझवण्यात यश आले आहे. आग इतकी भीषण होती की, या आगेवर नियंत्रण मिळवणं हे अग्निशामक दलाला फार कठीण जात होतं मात्र तरीही या आगेवर नियंत्रण मिळवलं आहे.