Sat. May 15th, 2021

सोन्याच्या दरात घसरण

गुरुवार आणि शुक्रवारच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात आणखी घसरण दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण होत आहे. सोन्याच्या पुरवठ्याच्या तुलनेत मागणी कमी झाल्याने गेल्या काही दिवसात सोन्याचे दर कमी झाल्याचे सांगितले जात आहे.

भारतीय बाजारातील मल्टी कमोडिटी एक्स्चेंज एमसीएक्स मध्ये सोन्याचे दर दुपारी १२ वाजेपर्यंत ४६,७८५ रुपये प्रति तोळे इतके होते. तर चांदीचे दर एमसीएक्समध्ये ६८,४२३ प्रतिकिलो इतके होते.

मुंबईत आजचे सोन्याचे दर स्थिर आहेत. कालच्या तुलनेत आज किंचित घसरण नोंदवली गेली आहे. तर चांदीच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

मुंबईत आज २२ कॅरेट सोन्याचा दर ४४,१६० रुपये प्रतितोळे इतका आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४५,१६० रुपये प्रतितोळे इतका आहे. तसेच चांदीचा आजचा दर हा ६७,५०० रुपये प्रतिकिलो इतका आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *