रेल्वे स्थानकावर भीक मागण्याऱ्या व्यक्तीकडे सापडले ‘एवढी’ रक्कम
मुंबईतील गोवंडी परिसरातला हा प्रकार

रस्त्यावर भीक मागताना लोकांना बघितल्यावर लोकांच्या मनात दया भावना निर्माण होते. मात्र याच भीक मागणाऱ्या लोकांकडून लोखो रुपये आढळले तर आश्चर्य वाटेल. गोवंडी रेल्वे स्थानक परिसरात भीक मागून स्वता:चा उदनिर्वाह करणाऱ्या एका व्यक्तीच्या घरातून पोलिसांना चक्क 12 गोणी भरून चिल्लर सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीचा 4 ऑक्टोबर रोजी रेल्वे अपघातात मृत्यू झाला. पोलिसांच्या तपासात या व्यक्तीबाबत हा मोठा खुलासा झाला आहे. या व्यक्तीकडून 12 गोणी भरून चिल्लर सापडल्याने ही रक्कम 4 ते 5 लाखांपर्यंत असल्याचा अंदाज पोलिसांनी लावला आहे.
नेमकं काय घडलं?
रेल्वे स्थानकावर भीक मागताना व्यक्ती दिसतात.
मात्र अशाच एका व्यक्तीकडून पोलिसांना चक्क 12 गोणी भरुन चिल्लर सापडल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्तीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला.
ही घटना मुंबईतील गोवंडी परिसरात घडली आहे.
पोलिसांच्या तपासात त्या व्यक्तीची बँकांमध्येही खाती असल्याची माहिती समोर आली.
या व्यक्तीच्या घरात १२ गोणी भरून चिल्लर सापडली.
या व्यक्तीकडे तब्बल २० ते २५ लाखांची रक्कम जमा असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
पोलिसांनी केलेल्या तपासात त्याचं पोस्टामध्ये खातं असल्याचं समोर आलं.