Sat. Apr 17th, 2021

IPL 2019 : मुंबई इंडियन्सची दिल्ली कॅपिटल्सवर 40 धावांनी मात

मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर 40  धावांनी मात केली आहे. घरच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात दिल्लीला पराभव पत्करावा लागला आहे. मुंबईने दिल्ली कॅपिटल्ससमोर 169 धावांचं आव्हान ठेवलं होतं तेही पुर्ण करण्यात त्यांना अपयश आलं आहे.यंदाच्या हंगामात आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना दिल्लीने 4 पैकी 3 सामने गमावले आहेत.घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सला पराभव पत्करावा लागल्यामुळे घरचं मैदान यावेळी त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरतंय असं म्हटलं जात आहे.

मुंबईने दिल्ली कॅपिटल्ससमोर169 धावांचं आव्हान

मुंबईने 40  धावांनी विजय मिळवत गुणतालिकेतं  दुसऱ्या स्थानावर मजल  मारली आहे.

कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून आधी बॅटिंग करण्याचा निर्णय  घेतला.

रोहित शर्माने 30 तर क्विंटन डि कॉक 35 रनांची भागीदारी  केली

30  आणि क्विंटन डि कॉक 35  या दोघांनी सार्थ ठरवला.

मिश्राच्या  बॉलवर रोहित फसला आणि क्लीन बोल्ड झाला.

सूर्यकुमार यादवने 15 ओव्हरपर्यंत डाव ओढून नेला तर  तोही 27 बॉलमध्ये 26 रन करून माघारी परतला.

हार्दिक पांड्या 32 आणि कृणाल पांड्या 37  या दोघांनी 54  रनांची पार्टनरशिप करत संघाला 168  पर्यंत नेऊन ठेवलं.

मुंबईकडून राहुल चहरने 3 जसप्रीत बुमराहने 2 बळी घेतले.

लसिथ मलिंगा, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याने 1-1बळी घेतल्याने दिल्लीला हे आव्हान पेलता आले नाही.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *