Tue. Sep 28th, 2021

पूरग्रस्त केरळच्या मदतीसाठी मुंबईतील जे.जे रुग्णालयातील पथक केरळमध्ये दाखल

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई

महापूराने त्रस्त झालेल्या केरळला जगभरातून मदतीचा हात दिला जात आहे. यामध्ये कोणी कपडे तर कोणी खाण्यापिण्याच्या वस्तू तसेच कोणी आर्थिक मदतीसाठी धाव घेत आहे. याचं पार्श्वभूमीवर केरळच्या मदतीसाठी मुंबईतूल जे.जे रुग्णालयातील पथक केरळला रवाना झाले आहे.

केरळच्या महापुरानं बाधित झालेल्या 1200 नागरिकांनी ‘आळापुळ्ळा’ तालुक्यातील एका शाळेत आसरा घेतला आहे. केरळात पाऊस थांबून एक आठवडा जरी झाला असला तरीही अनेक भागांमधलं पुराचं पाणी अद्याप कमी झालेलं नाही. त्यामुळे अनेक लोकांना विविध ठिकाणी आसरा घ्यावा लागला आहे.

आळापुळ्ळा येथील कॅम्पमध्ये मुंबईतील जे.जे रुग्णालयातील पथक तैनात असून ते रुग्णांवर उपचार करत आहेत.

लेप्टोपायरसीससारखे साथीचे रोग पसरण्याची भीती असल्याने त्याबाबतही हे डॉक्टर सतर्क आहेत. याशिवाय डायबीटीस आणि ब्लडप्रेशरनं ज्या व्यक्ती आजारी आहेत ज्यांना औषध घ्यायला मिळालेली नाहीत अश्या व्यक्तीकडे विशेष लक्ष दिलं जातं आहेत.

याशिवाय इथल्या रुग्णांशी संवाद करताना भाषेची अडचण येत असल्याने मुंबईतल्या डॉक्टरांनी मल्याळम भाषा शिकली इतकंच नव्हे तर इतक्या रुग्णांना आपण त्यांच्यातले वाटावे यासाठी डॉक्टरांनी देखील स्थानिकासारखा पेहराव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *