मुंबईत ‘या’ 7 दिवसात कमी दाबाने होणार पाणीपुरवठा

मुंबई : शहरातील जनतेला येत्या दिवसात पाणीकपातीचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. पुढील काही दिवसांपासून मुंबईत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. मुंबईतील सर्वच ठिकाणी ही पाणीकपात होणार आहे.
3 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. एकूण 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
म्हणून पाणीकपातीचा निर्णय
पिसे उदंचन केंद्रामध्ये न्यू मॅटिक गेट सिस्टीमच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे. यामुळे 10 टक्क्यांच्या कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा साठा करुन ठेवावा, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.