Fri. Apr 23rd, 2021

#MumbaiMarathon 2019: केनियाचा कॉसमस लॅगट ठरला मुंबई मॅरेथॉनचा विजेता!

मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदाच्या वर्षात केनिया आणि इथियोपियाच्या धावपटूंचे वर्चस्व पहायला मिळाले. केनियाच्या कॉसमस लॅगटने पुरुष गटात मुख्य स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. तर महिला गटात इथिओपियाच्या वोर्केंश अलेमूने बाजी मारली आहे. या दोन्ही खेळाडूंनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान मोडीत काढत मुंबई मॅरेथॉनचा किताब पटकावला आहे. पूर्ण मॅरेथॉनच्या भारतीय गटात पुरुषांमध्ये नितेंद्रसिंह रावतने पहिले तर सुधा सिंहने महिलांच्या गटात पहिले स्थान मिळवले आहे. पुरुषांमध्ये गोपी टी. ने दुसरे तर करणसिंहने तिसरे स्थान मिळवले आहे.

दुसरीकडे मुंबई मॅरेथॉनच्या 21 किलोमिटर हाफ मॅरेथॉन प्रकारात पुरुषांमध्ये श्रीनू मुगाता आणि महिलांमध्ये मीनू प्रजापती यांनी बाजी मारली आहे. हाफ मॅरेथॉन प्रकारात महाराष्ट्राच्या कालिदास हिरवेला तिसरे तर महिलांमध्ये महाराष्ट्राच्या साईगीता नाईकने दुसरे स्थान पटकावले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्पर्धेला धावपटूंनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *