Tue. Apr 20th, 2021

नोकरीची सुवर्णसंधी! मुंबई मेट्रोमध्ये 1053 पदांसाठी भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मुंबई मेट्रोने (Mumbai Metro) सुवर्णसंधी देऊ केली आहे.  महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRDA) तर्फे मुंबई मेट्रोमध्ये 1053 जागांची भरती निघाली आहे. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती असणार आहे. ही नोकरी permanent job स्वरूपाची असणार आहे. विशेष म्हणजे निवडल्या गेलेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार (Seventh Pay Commission) पगार मिळणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया

अर्जाची प्रक्रिया online आहे.

नोकरी (Job vacancy) साठी पात्र तरूणांनी www.mmrda.maharashtra.gov.in या साईटवर अर्ज भरायचा आहे.

16 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या तारखेपर्यंत MMRDA कडे अर्ज करता येऊ शकतो.

नंतर अर्जदारांची लेखी परीक्षा होईल.

या परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांची कागदपत्रं तपासणी होईल.

तपासणी नंतर मुलाखत घेतली जाईल.

 

अर्जासाठी ओपन वर्गासाठी परीक्षा फी 300 रुपये आणि राखीव वर्गासाठी 150 रूपये एवढी आकारण्यात येईल. मराठी तरुणांसाठी मुंबईमध्ये काम करण्याची ही मोठी संधी आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *