Mon. Mar 8th, 2021

जनसामान्यांसाठी मेट्रो पुन्हा धावणार

सात महिन्यांपासुन बंद असलेली मेट्रो सेवा पुन्हा कार्यरत…

कोरोनामुळे देशात तसेच महाराष्ट्रात जनजीवन विस्कळीत झाले होते त्याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर पडत असुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात तसेच राज्यात वाहतूक बंद होती. सध्या अनलॉक ५ ला सुरूवात झाली आहे. यात राज्यसरकारने अनेक गोष्टी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत याच पार्श्वभूमीवर मेट्रो रेल्वेची सुविधा सर्वसामान्यासाठी आजपासुन सुरू करण्यात येत आहेत.

गेल्या सात महिन्यांपासुन बंद असलेली मेट्रो सेवा आजपासुन (१९ ऑक्टोंबर) सुरू झालेली आहे. संपूर्ण नियमांचे पालन करून प्रवाशांना मेट्रोमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. दिवसातून २०० मेट्रोच्या फे-या होणार आहेत तसचं मेट्रो सेवा सकाळी ८.३० ते रात्री ८.३० पर्यंत कार्यरत असणार आहे. एकावेळी ३०० पेक्षा जास्त प्रवासी मेट्रोने प्रवास करू शकणार आहेत.

मेट्रो प्रवासासाठी नियमावली:

प्रत्येक प्रवाशांना सँनिटाईज करून त्यांच तापमान तपासले जाईल.

टोकन तिकीट बंद करून क्यूआर कोड द्वारे,मोबाईल तिकीट अथवा पेपर तिकीट काढले जाईल.

फेसमास्कचा वापर अनिवार्य करण्यात येईल.

मेट्रोची आसनव्यवस्था स्टिकर्सच्या मदतीने करण्यात येणार आहे.

प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रिनिंग केले जाईल.

प्रत्येक फेरीनंतर मेट्रो रेल सॅनिटाईज केली जाईल. मेट्रोचे तापमान २५-२७ सेंटीग्रेटमध्ये ठेवले जाईल तसेच काल मोनोरेल चालु झाली असुन मुंबई लोकल अजुनही अत्यावश्यक कर्मचा-यांसाठी चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *