Thu. Jan 20th, 2022

जामिनावर असलेल्या आरोपीचा वाढदिवस साजरा

मुंबई : जोगेश्वरी पूर्वेतील एमएमआरडीए कॉलनीतील सराईत गुन्हेगाराच्या राहत्या घरी गेल्या आठवड्यात वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. जोगेश्वरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र नेर्लेकर हे जामिनावर असलेला आरोपी दानिश सय्यद याच्यासोबत केक कापताना व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
आरोपी सय्यद याच्यावर गोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३०७ खुनाचा प्रयत्न करणे, कलम १४८ प्राणघातक हत्यारासह दंगा करणे, कलम ३२४ घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक दुखापत पोहचवणे, कलम ५०४ शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे अशा विविध प्रकारचे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.याशिवाय जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी तलवार घेऊन फिरणे अशा गंभीर प्रकाराची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल आहे.
वरिष्ठ पोलिसांसोबत संगनमत असल्याने गुन्हेगारांचा आत्मविश्वास वाढत असल्याचे अनेकवेळा समोर आले.अशा पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी होत आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर शेअर करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *