Sat. Aug 13th, 2022

मनसे नेते नितीन नांदगावकरांना तडीपारची नोटीस

मनसे नेते नितीन नांदगावकर यांना मुंबई पोलिसांनी दोन वर्षे तडीपारची नोटीस बजावली आहे.

नांदगावकरांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून कायदा हातात घेतला असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

याबाबतची माहिती खु्द्द नितीन नांदगावकरांनीचं  दिली असून त्यांनी स्वत: चा एक व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला आहे.

काय म्हणाले नांदगावकर ?

ड्रग्स विकणारी टोळी, रिक्षा चालकांची दादागिरी आणि पासपोर्ट घोटाळा उघडकीस आणत असताना  कायदा हातात घेतला असा आरोप माझ्यावर केला असल्याची माहिती त्यांनी या व्हिडिओमधून दिली.

सर्वसामान्य नागरिक माझ्यामुळे भयभीत झाले आहेत. या प्रकारचे बिनबूडाचे आरोप माझ्यावर करून मला तडीपार करण्यासाठी मुंबई पोलीस कामाला लागले आहेत.

मी कुठे चुकतोय हे जनतेने मला सांगावे.

महाराष्ट्र माझा आहे. मला कुठे तडीपार करणार? असा सवाल त्यांनी या व्हिडीओमधून विचारला आहे.

तुम्ही काहीही केले तरी मी अन्यायाच्या विरोधात लढत राहणार. असा ईशाराही त्यांनी या व्हिडिओमधून दिला आहे.

सोशल मीडियावर नेटीझन्सनी नांदगावकर यांना पाठींबा दिला आहे. तर ट्विटरवर #isupportnitinnandgaonkar या नावाने मोहिमही सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.