निव्वळ ATM कार्डद्वारे बँकांची करोडोंची फसवणूक!

विजय मल्ल्या, निरव मोदी यांनी बँकांची फसवणूक करत परदेशात पोबारा केला. त्यानंतर बँकांची फसवणूक अनेकांची यादीच समोर येऊ लागली. मात्र मुंबईतील नागपडा पोलिसांनी अशा दोनजणांना अटक केलीय, जे बँकेच्या ATM द्वारे बँकेची फसवणूक करत होते.
काय करायचे हे चोर?
ATM मध्ये पैसे काढण्यासाठी जायचे
त्यावेळी मशीन ऑफलाईन करायचे
आणि पैसे आलेच नाहीत, असं बँकेच्या कस्टमर सर्विस मध्ये कॉल करून सांगायचे.
या युक्तीने त्यांनी बँकांना करोडो रुपयांनी लूटले.
कसं पकडलं या चोरांना?
हे दोन्ही आरोपी राजस्थानमधील आहेत.
महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, गोवा या राज्यात अशाप्रकारे चोरी करून धुमाकूळ घातला होता.
परंतु एका जबरी चोरीच्या गुन्हाचा तपास करत असताना या दोघांना नागपाडा पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतलं.
चौकशीदरम्यान या दोघांकडे 55 विविध बँकांची ATM कार्ड्स आढळून आली.
त्यानुसार पोलिसांनी तपास केला असताना ATM च्या माध्यमातून चोरी करत असल्याचं त्यांनी कबूल केलं.
आणखी यामध्ये कोण कोण सामील आहेत याचा तपास नागपडा पोलीस करत आहेत.
बँकांना अशा चोरीचा पत्ताच नाही!
या गुन्ह्याची माहिती पोलिसांनी संबंधित 14 बँकांना देण्यात आली
तेव्हा कुठे या बँकांना आपल्या पैशांची चोरी अशाप्रकारे झाल्याचं समजलं.
नागरिकांचा पैसा सुरक्षित ठेवण्याच्या वल्गना करणाऱ्या बँकांना या चोरीचा पत्ताच नव्हता.
पण बँकांकडून या संदर्भात अजून कोणतीही तक्रार केली गेली नाहीये.
त्यामुळे बँकांची अशी फसवणूक झाली असली तर बँकांनी पुढे येऊन त्यांची तक्रार करावी, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.