Sat. Oct 24th, 2020

346 कोटींची अधिक वसुली होऊनही मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोलधाड सूरूच

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोलवसुलीचे लक्ष्य पूर्ण झाले तरी टोलधाडीचा भार हा सर्वसामान्यांच्या खिशावर कायम आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कंत्राटदार कंपनी म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला दोन हजार 869 कोटी रुपयांच्या टोलवसुलीचे लक्ष्य होते.

 

ते लक्ष्य नोव्हेंबर 2016मध्येच पूर्ण झालेले असूनही टोलवसुली अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे किमान 346 कोटींची अधिक वसुली वाहनधारकांकडून झाल्याने कंपनीचा टोलवसुली हक्क रद्द करण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत अशा विनंतीची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *