Tue. Oct 27th, 2020

जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर रात्री किन्नरांचा राडा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर शुक्रवारी रात्री किन्नरांचा राडा पहायला मिळाला. जवळपास 5 किन्नरांनी चिंचवड-आकुर्डी परिसरात धुमाकूळ घातला. या किन्नरांच्या टोळक्याने भररस्त्यात हैदोस घालत वाहनचालकांकडून वसुलीस सुरूवात केली.

 

मात्र कोणीही पैसे देत नसल्याचं पाहून या किन्नरांनी सर्व लाज बाजुला ठेवत, थेट भररस्त्यात नंगानाच केला. त्यांच्या या कृत्याने उपस्थितांना क्षणभर काय करावं हेच सुचत नव्हते.

 

हा सर्व प्रकार पाहून मग तातडीने वाहनचालकांनी आपपाली वाहनं पिटाळण्यास सुरूवात केली. मात्र, या किन्नरांना गाड्यांपुढे धाव घेत. तर काहींना बळेच पकडून वसुली कशी होईल हे पाहिलं.

 

जवळपास अर्धातास या पाच किन्नरांच्या टोळीने हैदोस घातला. ज्यांनी पैसे दिले नाहीत त्यांना शिवीगाळ, शिव्याशाप तर दिलेच. तसंच काहींवर थेट हात उलचण्यासही मागेपुढे पाहिलं नाही.

हा सर्व प्रकार सुरू असताना रस्त्याने जाणाऱ्या महिलांवर लाजेने मान खाली घालण्याची वेळ आली. हा सर्व प्रकार सुरू असताना मात्र त्यावेळी एकही पोलीस घटनास्थळी पोहोचला नाही हे विशेष.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *