Thu. Sep 16th, 2021

कोरोना निर्बंधांत मुंबईकरांना दिलासा

मुंबई: मुंबईकरांना आजपासून कोरोना निर्बंधांतून दिलासा मिळाला आहे. मुंबईचा पॉझिटिव्ही रेट १ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत मुंबई महापालिकेने सुधारित नियमावली जाहीर केली आहे. यानुसार मुंबईत आजपासून आठवड्याचे सातही दिवस दुकानं रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसंच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सही सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. मात्र मॉल्सबाबत पालिकेच्या आदेशात कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.

काय आहेत नवे नियम?

  • दुकाने रात्री ८ पर्यंत खुली राहणार
  • सिनेमागृह बंद राहणार
  • सोमवार ते शनिवार रात्री ८ पर्यंत मॉल्स सुरु, फक्त रविवारी बंद
  • उद्याने, मैदान, बगीचे सुरु राहणार
  • खासगी, शासकीय कार्यालये सुरु
  • धार्मिक स्थळे बंद राहणार
  • सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये निर्बंध
  • शाळांसाठी शिक्षण विभागाचा आदेश कायम
  • व्यायामशाळा, केशकर्तनालय ५० टक्के क्षमतेने रात्री ८ पर्यंत सुरु

कोरोना निर्बंध असलेले जिल्हे:

कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *