Tue. Apr 13th, 2021

सुशांतसिंह ड्रग्ज प्रकरणी एनडीपीएस न्यायालयात एनसीबीने आरोपपत्र दाखल केले

मुंबई – सुशांतसिंह राजपूत आत्महत्ये संबंधित ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आज विशेष एनडीपीएस न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. 12 हजार पानांच्या या आरोप पत्रात अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक आणि अन्य 31जण आरोपी आहेत. या प्रकरणात मुंबईतील काही ड्रॅग पेडलर्सचाही समावेश असून रिया, शोविक, सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत आणि क्षितिज प्रसाद सर्वांना एनसीबीने अटक केली होती. ड्रग्ज जप्त केल्याचा आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केल्याचा अहवाल, फॉरेन्सिक अहवाल, साक्षीदारांच्या निवेदनांच्या आधारे हे आरोपपत्र तयार करण्यात आले आहे. शिवाय या आरोपपत्रासंदर्भात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे न्यायालयात दाखल झाले होते.

रिया चक्रवर्तीला ७ ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयाने ड्रग्ज प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावले होती त्यानंतर काही दिवसानंतर तिचा जामीन मंजूर केला. रियासोबतच सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंत यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला. या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि अब्दुल परिहार यांना त्याच दिवशी जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला होता. रियाला एक लाख आणि अन्य दोघांना 50 हजारांच्या जात मुचकल्यावर हा जामीन मंजूर झाला होता. काही दिवसांनंतर शोविकला देखील जामीन मिळाला आहे.

१४ जून २०२० बॉलीवुड अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली. सुशांत आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीच्या चौकशी दरम्यान ड्रग्ज अँगल समोर आल शिवाय एनसीबीने रिया चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीचे यांचे ड्रग्स माफियांसोबत संबंध असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर एनसीबीने याच प्रकरणात जैद या आरोपीला अटक केली होती. या प्रकरणावर आणखी देखील चौकशी सुरू आहे आणि दिवसेंदिवस याप्रकरणी अनेक खुलासे होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *