Mon. Sep 20th, 2021

धारावीत सोमवारी एकही कोरोना रुग्ण नाही

 

मुंबई: राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील धारावी झोपडपट्टी भागात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळण्याचं प्रमाण पाहायला मिळाल्यामुळं हा परिसर कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आला होता.धडकी भरेल अशीच कोरोना रुग्णसंख्या धारावीमध्ये पाहायला मिळाली होती.

परंतु , पालिका कर्मचारी, आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवी संस्था अशा कोविड योद्ध्यांच्या योगदानानं आणि अर्थातच नागरिकांच्या सहकार्यानं धारावीनं कोरोनाशी लढा दिला आणि खऱ्या अर्थानं बऱ्याच अंशी हा लढा यशस्वीही ठरला.

सोमवारी (१४ जून) आलेल्या नव्या आकडेवारीनुसार धारावीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या या परिसरात सोमवारी एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. कोरोनाचा नवा एकही रुग्ण न आढळणं ही एक मोठी दिलासादायक बाब आहे. तब्बल चार महिन्यानंतर पहिल्यांदा धारावीत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *