#KargilWar: शहीदांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलणार सिद्धिविनायक ट्रस्ट
भारतीय लष्करातील महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या मुलांचा ‘केजी टू पीजी’पर्यंतचा शैक्षणिक खर्च उचलण्याचा निर्णय श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने घेतला आहे.

देशभरात साजरा होणाऱ्या कारगिल विजय दिन साजरा करत असताना मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. भारतीय लष्करातील महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या मुलांचा ‘केजी टू पीजी’पर्यंतचा शैक्षणिक खर्च उचलण्याचा निर्णय श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने घेतला आहे.
कारगिल दिनानिमीत्त उपक्रम
महाराष्ट्रातील भारतीय लष्करातील शहीद झालेल्या जवानांच्या मुलांचा ‘केजी टू पीजी’पर्यंतचा शैक्षणिक खर्च उचलण्याचा निर्णय मुंबईच्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने घेतला आहे.
आदेश बांदेकर यांनी नुकत्याच झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
या बरोबरच युद्धात जायबंदी झालेल्या जवानांसाठी पुण्यात कार्य करणाऱ्या ‘क्वीन मेरी’ या संस्थेला न्यासाने २५ लाखांचा धनादेश दिल्याचे सांगण्यात आलं आहे.
धार्मिक कार्यक्रमांबरोबच विविध सामाजिक कार्यांमध्ये मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती न्यासाचा सहभाग आहे.
आज 26 जुलै देशभरात साजरा होणाऱ्या कारगिल विजय दिनानिमीत्त हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
शहीद जवानांच्या मुलांच्या ‘केजी टू पीजी’ शिक्षणाचा खर्च उचलण्याचा हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.